श्रीमंत माधवराव पेशवे - भाग ३

 

भाग ३

राक्षसभुवन च्या युद्धाच्या वेळेस राघोबा निजामाच्या घेऱ्यात एकटे सापडले असताना माधवरावांनी स्वतः रणांगणात उतरून  निजामाच्या सैन्याच्या तावडीतून राघोबांना बाहेर काढलेले. ह्या घटनेतून माधवरावांची बुद्धिकौशल्य आणि युद्धकौशल्यात असलेली निपुणता दिसून आली. 

प्रसंग असा होता कि घरभेदामुळे निर्माण झालेल्या वातावरणामुळे काही सरदार मंडळी निजामाला मिळालेली. मात्र काही जण असेही होते कि त्यांच्या मदतीची अपेक्षा माधवरावांना होती. निजामाची फौज जास्त आहे आणि समोरासमोर आपला टिकाव लागणे अवघड आहे हे ओळखून माधवरावांनी छत्रपतींच्या गनिमी काव्याचे धोरण वापरण्याचा निश्चय केला. निजाम पुण्याला येत आहे हे माहित असून सुद्धा पुण्याला जाण्याच्या ऐवजी निजामाच्या प्रांतात जाऊन तिथे लुटपाट करायची आणि निजामाला झुरवत ठेवायचा बेत माधवरावांनी आखला. दरम्यान निजामाला मिळालेल्या सरदारांपैकी गोपाळराव पटवर्धनांना बोलणी करून पुन्हा आपल्या बाजूने वळवायचा प्रयत करण्याचाही विचार केला. आणि औरंगाबाद लुटायचा हेतूने मोहिमेचे नियोजन सुरु झाले. परंतु मोहिमेसाठी लागणाऱ्या फौजफाटा चालू ठेवण्यापुरता पण पैसे राहिला नाही हे विचारात घेऊन सर्व सरदारांवर चौथाई चा हुकूम माधवरावांनी जरी केला.

जेव्हा निजाम आक्रमण करणार हे कळल्यावर त्याच्याच प्रांतात जाऊन लूटमार करण्याच्या उद्देशाने पेशवे प्रथम औरंगाबाद प्रांतात गेले आणि तिथे यथेच्छ लूटमार केली. आणि त्यांनी आखलेली योजना कामी आली. निजाम भीमा नदीपासून फिरून पेशव्यांकडे औरंगाबादेला येऊ लागला. हे समजताच पेशव्यांनी त्यांचा मोर्चा नागपूरच्या भोसलेंच्या प्रांतात वळवला  आणि संपूर्ण व्हरांडा प्रांत लुटला. त्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा थेट निजामाच्या घरात म्हणजेच हैद्राबादेला वळवला आणि निजाम प्रांतात लूटमार सुरु केली.

इकडे त्याचवेळेस विठ्ठल सुंदर आणि काही इतर सरदारांच्या सल्ल्यानुसार निजामाने थेट पुण्यावर आक्रमण करून पुणे लुटले आणि प्रचंड मोठी नासधूस केली.पुणेकरांनी मिळेल ते हातात घेऊन सिंहगड आणि पुरंदर किल्ला गाठला. शहरातील सर्व मंदिरे, तोफखाना, कारखाने, पर्वती वरील मूर्ती सगळ्यांची नासधूस करून निजामाने औरंगाबादचा रस्ता धरला आणि पुणे सोडले.

पुण्याची इत्ताम्भूत्त माहिती देणारे जोपर्यंत निजामासोबत आहेत तोपर्यंत निजामाला हरवणे अडवाघ जाईल हे ओळखून  मल्हारराव होळकर व इतर अनुभवी आणि विश्वासू सहकाऱ्यांवर माधवरावांनी निजामांकडे मराठी सरदारांना परत आणण्याची जबाबदारी सोपवली आणि निजामाला जाऊन मिळालेले मिरजेचे पटवर्धन आणि नागपूरचे भोसले यांसह काही इतर सरदारांना सोबत घेण्यात मल्हाररावांना यश आले. निजामासोबत औरंगाबादेत जाताना पावसाळ्याचे कारण काढून पटवर्धन आणि भोसल्यांनी त्यांच्या फौज निजामापासून थोड्या अंतरावे केल्या आणि निजाम गोदावरी ओलांडणार ह्याची कल्पना पेशव्यांना दिले गोदावरीच्या अलीकडेच आक्रमण करण्याचे सूचित केले. 

निजामाचा विश्वासाचा विठ्ठल सुंदर निजामाच्या फौजेसह एकटा गोदावरीच्या अलीकडे होता. तोवर निजाम पूर आलेली गोदावरी पार करून पलीकडे आपल्या तोफखान्यासह गेला. विठ्ठलसुंदर एकटा असल्याचे पाहून तीच संधी साधून राक्षसभुवन येथे पेशव्यांनी विठ्ठलसुंदर वर आक्रमण केला. युद्धात प्रशव्यांचे पारडे जाड होताना पाहून विठ्ठल सुंदर स्वतः युद्धात उतरला आणि युद्धाचे पारडे त्याने त्याच्या बाजूने फिरवण्याचा प्रयन्त केला. त्या परिथितीत राघोबा एकटे शत्रूच्या तावडीत सापडलेले माधवरावांनी पहिले. आणि स्वतः काही फौज घेऊन शत्रू गोटात शिरले आणि काकांना त्यातून बाहेर काढले.

युद्ध सुरु असताना साऱ्यांच्या नजारा ह्या विठ्ठल सुंदर च्या अंबारी वर होत्या. निजामाच्या ७ अंबरींपैकी एकात विठ्ठल सुंदर होता. तशात महादजी सितोळे नामक सरदाराने जीवाची पर्वा न करता आपला घोडा शत्रू गोटात नेला आणि विठ्ठल सुंदरीच्या अंबारीचा अजून नेम धरून विठ्ठल सुंदर ला खाली पडला. विठ्ठल सुंदर पडला हे पाहून साऱ्या निजाम फौजेची धावपळ उडाली आणि आणि एकाच हाहाकार मजला.संपूर्ण रणांगणात विठ्ठल सुंदर चे शीर भाल्याच्या सैन्यात टोकावर फिरत राहिले.

वयाने लहान असणाऱ्या माधवरावांना जीवनात घडणाऱ्या अनेक घटनांनी आणि त्या परिस्थितीत आलेल्या अनुभवाने खूप काही शिकवले.आळेगावात झालेल्या युद्धात स्वतःचे काकाच समोर उभे असताना आणि तेच काका राक्षसभुवनच्या युद्धात शत्रूगोटात सापडलेले पाहून स्वतः रणांगणात उतरून त्यांना सोडवताना माधवरावांचे फक्त युद्धकौशल्याच नाही तर त्यांचे बुद्धिकौशल्य आणि लहान वयातही अनेक महत्वाचे निर्णय घेण्याची निर्णय क्षमता आणि ते पूर्ण करण्याची जिद्द ह्या सगळ्यांमुळे आज मधारावांचे स्वतःचे एक स्थान इतिहासात निर्माण झाले. जरी राक्षसभुवन च्या युद्धाचा अंत हा तह करून झाला तरी युद्धातून दिसून आलेले माधवराव हे एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचले.  

(क्रमशः)


by..

वेदांत उत्पात ,अनिरुद्ध उत्पात

Comments

Popular Posts