श्रीमंत माधवराव पेशवे - भाग १
भाग १
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी वडिलांचा वियोग व्हावा ,आणि त्यातून सावरणेही झाले नसावे तोच एक मोठी जबाबदारी खांद्यावर येऊन बसावी .
कालपर्यंत जे लांबून बघायला मिळत होते ते आज जबाबदारी म्हणून मिळावे आणि हि जबाबदारी पेलण्याच्या आधीच घरातील आपल्या लोकांचे आपल्या विरोधातील सूर ऐकू यावे अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली.
क्षणार्धात चित्र बदलून गेलेले.त्या दिवशी सर्व सरदार मंडळी वाड्यावर जमा होऊ लागले होते.सर्व सरदार व मानकऱ्यांनी गणेश महालातील दरबार भरलेला होता. सरदार व मानकरी आपापल्या बैठकीवर बसले होते.
त्यांच्यासाठी ना ते सरदार लोक नवीन होते ना तो गणेश महाल ,तरीही ज्या गणेश महालातून आजपर्यंत त्यांच्या वडिलांचा आवाज ऐकू येत असे तो मात्र आता त्यांना ऐकू येणार नव्हता.
जेव्हा ते गणेश महालात प्रवेश करू लागले , तेव्हा सर्व मंडळी शांत झाली व क्षणार्धात सर्वांच्या माना मुजरा करण्यासाठी खाली गेल्या .गणेश महालातील गजाननाला वंदन करून व त्या सर्वांच्या मुजारांचा स्वीकार करून जेव्हा ते गजाननाच्या समोरील आसनावर आरूढ झाले तेव्हा ते बनले हिंदवी साम्राज्याचे ९ वे पेशवे....
श्रीमंत माधवराव पेशवे
(क्रमशः)
by..
वेदांत उत्पात ,अनिरुद्ध उत्पात
Comments