गर्व से कहो हम भारतीय हैं।
गर्व से कहो हम भारतीय हैं।
भारत माझा देश आहे,सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे...
हि प्रतिज्ञा आपण लहानपणीच शिकलो. पण भारत माझा देश आहे आणि माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे सांगणारे आज किती जण दिसतात?? उलट देशाबद्दल प्रेम व्यक्त करण सोडाच पण आपला भारत हा बाकीच्या देशांपेक्षा कसा मागे आहे, इथल्या रुढी-परंपरा ह्या कशा चुकीच्या आहेत हे उघड पणे सांगण्यात काही जणांना मोठेपणा वाटतो.देशात राहूनच देशाच्या विरोधात सरेआम नारेबाजी करताना काहीच वाटत आहे... "सौं मे से अस्सी बेईमान फिर भी मेरा भारत महान" असे म्हणणाऱ्यांची जीभ जराही कचरत नाही.असे बोलून देशाचा अपमान होईल असे जराही वाटत नाही. हे वाक्य म्हणणाऱ्याला त्या ऐंशी पैकी कुठल्या स्थानी घालावे असा विचार मनात येतो. ह्यांसारखे ऐंशी जण असतीलही बेईमान ,पण आजही ह्या देशावर प्रेम करणारे ते वीस जण ह्या ऐंशी जणांना पुरून उरतात म्हणून आजही माझा देश महान आहे.
आज संपूर्ण जगभरात भारतातील ग्रंथांचा, वेदांचा अभ्यास केला जातो.भारतीय संस्कृतीचा उगम निश्चित सांगता येत नसेल तरी असे मानले जाते कि भारतीय संस्कृती नंतर 48 संस्कृती लोप पावल्या तरीही भारतीय संस्कृती तिचे अस्तित्व टिकवून आहे आणि जगात एक महान संस्कृती मानली जाते.
फक्त संस्कृती च्या बाबतीतच नव्हे तर कला, क्रीडा, विज्ञान ह्या क्षेत्रात पण भारतीय त्यांची महत्ता सिद्ध करताना दिसतात. मग ते पोखरण अणु चाचणी करून जगाला आश्चर्याचा धक्का देणारे वैज्ञानिक असोत , क्रिकेट मध्ये 100 शतके करणारा क्रिकेट चा देव असो , व अजून वेगवेगळ्या क्षेत्रात देशाचे नाव मोठे करणारे भारतीय असोत.
आज भारत देश जगात महासत्ता बनण्याची क्षमता सिद्ध करताना दिसत असताना देशाचे नागरिक म्हणून आपण प्रत्येक गोष्टीत चुका शोधत बसण्यापेक्षा देशाला महासत्ता बनवण्याच्या दिशेने प्रयत्न करणे गरजेचे आहे भारत व भारतीय संस्कृति ला पुढे घेवून जाणे हेच स्वतंत्र मिळवल्याचे चीज असेल आणि देशभक्तांना केलेले अभिवादन .तेंव्हा आता वेळ आहे कामाची देशासाठी काम करण्याची..
शेवटी एवढेच सांगू इच्छितो कि...
by
Vedant & Aniruddha

भारत माझा देश आहे,
सारे भारतीय माझे बांधव आहेत,
देशावर माझे प्रेम आहे
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांच्या पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
।।जय हिंद।।
by
Vedant & Aniruddha
Comments